राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त मनसेचा ज्ञानार्पण सोहळा, 53,000 पुस्तकांचे घरोघरी वाटप
नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष गजानन काळे यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस साधून नवी मुंबईत 53 हजार पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. आज पासून पुस्तक वाटपाची सुरवात करण्यात आली आहे. पुढील एक वर्ष हा ज्ञानार्पण सोहळा चालणार आहे. एका कुटुंबाला एक पुस्तक असे 53 हजार कुटुंबांपर्यंत या पुस्तकाच्या माध्यमातून मनसे पोहोचणार आहे. मनसेने 100 पुस्तकांची यादी लोकांना दिली असून यातील हवे असलेले एक पुस्तक त्यांनी निवडायचे आहे.
Tags :
Raj Thackeray Navi Mumbai Raj Thackeray MNS Raj Thackeray Birthday Gajanan Kale Mns Raj Thackeray