Tukaram Omble Brother : Tahawwur Rana याला सार्वजनिक जागी फाशी द्या, एकनाथ ओंबळेंची मोठी मागणी

Tukaram Omble Brother : Tahawwur Rana याला सार्वजनिक जागी फाशी द्या, एकनाथ ओंबळेंची मोठी मागणी

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा अखेर भारतात दाखल झाला आहे. अमेरिकेतून विशेष विमानाने त्याला नवी दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्था (NIA)च्या पथकासोबत तो भारतात दाखल झाला असून, त्याच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. 6/11 हल्ल्याच्या कटामध्ये त्याची भूमिका अत्यंत गंभीर होती. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरु होती आणि आता ती यशस्वी झाल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणावर केंद्रित झाले आहे.दरम्यान, शहीद पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळे यांनी राणाला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याची मागणी केली आहे. राणावर कठोर शिक्षा देण्याची मागणी देशभरातून जोर धरत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola