Fake TRP | मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त, पुढची प्रक्रिया काय असणार?

Continues below advertisement
माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी हाती आली आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखील अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीची देखील यात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह 'बार्क'चे सीईओ सुनील लुल्ला यांची भेट घेणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram