Agitation for Marathi | मराठीसाठी एकाकी लढा देणाऱ्या लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी बातचीत
मराठीत बोलण्याची मागणी केल्याने दुकानदाराने अपमान केला म्हणून मुंबईतील कुलाबा परिसरात एका लेखिका गुरुवारी (8 ऑक्टोबर) दुपारपासून दुकानाबाहेर रस्त्यावर ठिय्या देऊन बसली आहे. शोभा रजनीकांत देशपांडे असं या लेखिकेचं नाव असून त्या कुलाब्यातच राहतात. मराठीत बोलण्याची मागणी केल्याने ज्वेलरने अपमानास्पद वागणूक देत दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोप या लेखिकेने केला आहे.