VVMT | वसई-विरार महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठ, दिव्यांगाना तीन महिन्यांसाठी मोफत पास सेवा | ABP Majha
वसई विरार महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरीक, अंध, अपंग, दिव्यांग व्यक्तिंसाठी पालिकेच्या परिवहन सेवेत मोफत पास सेवा उपलब्ध केली आहे. ही पास सेवा फक्त तीन महिन्यासाठी असल्याने ज्येष्ठ नागरीक आणि दिव्यांगाना दर तीन महिन्यांनी पाससेच नुतनीकरण करण्यास यावं लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने यावर आक्षेप उचलून ही सेवा आगामी निवडणुका समोर ठेऊन केल्याचा आरोप केला आहे. तर पालिकेने भविष्यकाळात कायमस्वरुपी पास सेवा देण्याचा मानस असल्याचं सांगितलं आहे.