Mumbai : मुंबईत तीन लाख लोकांची कोरोना लशीच्या दुसऱ्या डोसकडे पाठ
लशीचा दुसरा डोस घेतला नसलेल्या मुंबईकरांचा पालिका शोध घेणार आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. मुंबई आणि परिसरात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे.