School : एक डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा होणार सुरू, शासन निर्णय जारी
Continues below advertisement
ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवास असले तरी 1 डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून शाळा भरणार असल्याचे सरकारनं स्पष्ट केलंय. या संदर्भात शासननिर्णय जारी झालाय. गर्दी टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आलेत. पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत सरकारचा निर्णय झाला असला तरी नाशिक पालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलाय. नाशिक पालिका या संदर्भात 10डिसेंबरला निर्णय घेणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी शाळा सुरु करण्याबाबत काय निर्णय होतो याकडं लक्ष लागलंय. सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि शहरी भागांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत.
Continues below advertisement