Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघिणीच्या 3 बछड्यांचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ३ बछड्यांचा मृत्यू झाला आहे. श्रीवल्ली या वाघिणीनं गेल्या महिन्यात ४ बछड्यांना जन्म दिला. त्यातील एकाचा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्याला फुफ्फुसांशी संबंधित समस्या असल्याचं कळतंय. त्यानंतर आणखी २ बछडे दगावले. श्रीवल्ली वाघिणीला बछडय़ांना दूध पाजता येत नव्हते. त्यामुळे त्यांना पुरेसं पोषण मिळालं नसावं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानातील सूत्रांनी दिली. बछड्यांच्या जन्मानंतर वाघिणीच्या पिंजऱ्याजवळ मानवी वावर वाढला, ज्याचा वाघिणीवर ताण आला असावा, ज्यामुळे तिला दूध पाजता येत नव्हतं, असंही सूत्रांनी सांगितलं.
Continues below advertisement