'हे तुमचं प्रॉडक्शन हाऊस नाही...!' उशिरा येण्यावरुन Sameer Wankhede यांनी Ananya Pandey ला फटकारलं
NCB update : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey)हिला चांगलंच फटकारलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चौकशीसाठी काल उशिरा दाखल झाल्यानं समीर वानखेडे चांगलेच संतापले होते. चौकशीसाठी 11 वाजताची वेळ दिली असताना अनन्या दुपारी 2 वाजता पोहोचली, त्यामुळं समीर वानखेडे यांनी तिला खडेबोल सुनावले.