Theater Reopen :मुंबईतील रंगशारदा नाट्यगृहात अखेर तिसरी घंटा वाजलीच, कलाकारांमध्ये जल्लोषाचं वातावरण

आजपासून राज्यभरातील नाट्यगृहे प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहेत त्यामुळे नाट्यक्षेत्रातील कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुन्हा एकदा थिएटर्स, नाट्यगृहं प्रेक्षकांसाठी खुली झाली असून थिएटर्स आणि नाट्यगृहांसाठी राज्य सरकारनं ५० टक्के आसनक्षमतेची अट घातली आहे. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं यावेळी बंधनकारक असेल. नियमांचं पालन न झाल्यास राज्य सरकारकडून कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईतील रंगशारदा नाट्यगृहात तिसरी घंटा वाजली त्यावेळी आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी घेतलेला हा आढावा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola