Mumbai Corona Update: मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ ABP Majha
मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांनी तीनशेचा आकडा ओलांडला. मुंबईत गेल्या २४ तासांत ३५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३३७ रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. गेल्या २४ तासांत मुंबईत २१३ नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळं मुंबईत कोरोनाचे १७९७ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ५३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याच २४ तासांत राज्यात ३२९ नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचे सध्या दोन हजार ५६८ सक्रिय रुग्ण आहेत.