Mumbai Metro : मेट्रो-४ या प्रकल्पाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्या

Continues below advertisement

मुंबई व ठाण्याला जोडणाऱ्या वडाळा-कासारवडवली या मार्गावरील मेट्रो-४ या प्रकल्पाविरोधातील दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. घाटकोपर परिसरातील या प्रकल्पाचे जवळपास दोन वर्षांपासून रखडलेले कामही आता मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प राबवण्याचे एमएमआरडीएला पूर्ण अधिकार आहेत. भूसंपादन प्रक्रिया मेट्रो कायद्यांतर्गतच करण्याचे सरकारला बंधनही नाही. त्यामुळे या प्रकल्पात काहीच अवैध नाही, असा युक्तिवाद राज्य सरकार आणि एमएमआरडीएतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ आणि अॅडव्होकेट अक्षय शिंदे यांनी युक्तिवाद केला. कोर्टानं तो ग्राह्य धरला. ठाण्यातील कासारवडवली ते वडाळा भक्ती पार्क असा हा मार्ग आहे.. ठाण्यातील तीन हात नाका, मुलुंडमधील आर-मॉल, भांडुप एलबीएस मार्ग, गरोडिया नगर ही या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram