Aryan Khan Case : आर्यन खानवरील आरोप हे फक्त खंडणी वसुलीसाठी : Nawab Malik

Continues below advertisement

मुंबई : आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, तसेच या प्रकरणात एनसीबीकडून ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा म्हणून आधार घेण्यात आलं होते त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीही नसल्याचं 28 ऑक्टोबरला दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीमध्ये म्हटलं आहे. आर्यन खान प्रकरणात जामीन देताना हायकोर्टानं दिलेल्या आदेशाची प्रत आता एबीपी माझाच्या हाती लागलीय. 

आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, तर आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. ड्रग्ज अरबाज खान आणि मुनमुनकडे सापडले आहेत. हे सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरते आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज, मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र रचलेलं दिसून येत नाही, अशी टिप्पणी 28 ऑक्टोबरला दिलेल्या जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयानं केलीय. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कोणताही कट रचलेलं दिसून येत नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram