Thane Rains : ठाणे शहरात मुसळधार पाऊस, Upvan lake काठोकाठ भरला
ठाण्यात सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे ठाण्याचा प्रसिद्ध उपवन तलाव काठोकाठ भरलाय. त्यामुळे आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास हा तलाव ओसंडून वाहू लागेल. दरम्यान, प्रशासनाकडून ठाणेकरांना विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन करण्यात आलंय. आणि त्याला ठाणेकरांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय.