Mumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर वाढला, मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झालीय. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रुझ, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलाय. तर, वडाळा-चेंबूर भागातही मुसळधार पाऊस बरसतोय. त्यातच समुद्रालाही उधाण आलंय. दरम्यान पावसाचा जोर वाढला असला तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे.