Thane Potholes : Eknath Shinde यांच्या पाहणीनंतरही रस्ते जैसे थेच; रस्त्यांच्या कामाचा Reality Check

Continues below advertisement

मुंबई नाशिक हायवे आणि ठाण्यातील घोडबंदर रोड यावर रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे. त्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौऱ्यात प्रसारमाध्यमांसमोर एम एम आर डी, ए एम एस आर डी सी, सार्वजनिक बांधकाम खाते आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रचंड खडसावले होते. आठ दिवसांच्या आत सर्व रस्ते गाडी चालवण्या लायक होतील असे आश्वासन त्यांनी दिले होते आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले होते. त्यानंतर ताबडतोब कार्यतत्परता दाखवत सगळ्याच सरकारी विभागांनी आणि ठेकेदारांनी डांबरीकरण करून रस्ते चकाचक केल्याचे दाखवले होते. मात्र गेले दोन दिवस होत असलेल्या पावसात हेच सर्व रस्ते पुन्हा एकदा वाहून गेले आहेत आणि परिस्थिती आधीपेक्षा देखील भयंकर झाली आहे. त्यमुळे आम्ही पालकमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याचा काही परिणाम झाला का, हे पडताळून बघण्यासाठी ठाण्यातील रस्त्यांचा रियालिटी चेक करायचे ठरवले. पालकमंत्र्यांनी पाहणी केलेल्या प्रत्येक रस्त्यावर आम्ही गेलो आणि या चेकद्वारे थुकपट्टी लावलेल्या कामांचा पर्दाफाश आम्ही करत आहोत. पाहुयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी केलेल्या रियालिटी चेक मध्ये नेमके कोणते वास्तव समोर आले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram