Thane : होळीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून कारवाई

Continues below advertisement

होळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून एक विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. होळीनिमित्ताने पाण्याचे फुगे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. घोडबंदर आणि दिवा भागात पथकाने नुकतीच कारवाई करून ४३ हजारांचा दंड वसुल केला आहे. या पथकाने दिवा स्थानक परिसरात ५५ दुकानांमध्ये कारवाई करून १५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तसेच दुकानदारांकडून २१ हजारांचा दंड वसुल केला आहे. या कारवाईमध्ये पाण्याच्या फुग्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांसोबतच इतर प्लास्टिकच्या पिशव्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram