Thane Mumbra : राज ठाकरेंना धमकी देणारा मुंब्र्यातील PFI संघटनेचे प्रमुख अब्दुल मतीन शेखानी फरार

Continues below advertisement

राज ठाकरेंना धमकी देणारे मुंब्र्यातील पीएफआय संघटनेचे प्रमुख अब्दुल मतीन शेखानी फरार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिलीय.. ठाण्यातील सभेत राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर मुंब्रा येथे पीएफआयच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं.. दरम्यान या आंदोलनावेळी पीएफआयचे मुंब्राचे अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी यांनी स्पीकरला हात लावल्यास कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा दिला होता..  दरम्यान या भडकाऊ भाषणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.. पोलिसांच्या दोन पथकांकडून अब्दुल शेखानीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिलीय..     

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram