Thane : निर्णयाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा गैरसमज दूर करु : जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानंतर टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी या म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचं वाटपही करण्यात आलं होतं. परंतु, या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.