Unlock 1.0 | मुंबईत कामाला जाणाऱ्या दिवा, ठाणे, डोंबिवलीकरांचे हाल; सकाळपासून बसच्या रांगेत
अनलॉकच्या घोषणेनंतर बरीच कार्यालया सुरु झाली असली तरी नोकरदारांच्या वाहतुकीसाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. सकाळी दहा वाजताची बस पकडण्यासाठी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच रांगेत उभं राहावं लागत आहे. यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या दिवा, ठाणे आणि डोंबिवलीकरांचे हाल होत आहेत.