Bhiwandi Rains | भिवंडी शहरासह ग्रामीण भागात रात्रभर दमदार पाऊस
भिवंडी शहारासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल या आधीच्या पावसात झालेली आहे, त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची भीती वर्तवली जात आहे. तसेच बाजारपेठ, तीन बत्ती मार्केट, बालाजी नगर, म्हाडा कॉलनीसारख्या सखल भागात पानी भरल्यास अनेक दुकानांमध्येही पाणी शिरण्याची भीती नागरिकांमध्ये होती.