Thane - CSMT भुयारी रेल्वे मार्ग आणि पनवेल- दिवा- वसई उपनगरीय रेल्वेचा प्रस्ताव मार्गी लागणार?

Continues below advertisement

ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे अंतर अवघ्या 21मिनिटांत पार करण्याचं स्वप्न रेल्वेनं पुन्हा एकदा दाखवलं आहे. सुमारे 34 किलोमीटरचा हा भुयारी मार्ग राज्य सरकारनं पुढाकार घेतला तर पुढे सरकू शकतो, असं एमआरव्हीसीचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी सांगितलंय. ही योजना 15 ते 18 हजार कोटी रुपयांची असून त्याला फक्त 25 हेक्टर खासगी जागा लागणार आहे. याशिवाय पनवेल ते वसई व्हाया दिवा अशा उपनगरीय रेल्वे मार्गाचा प्रस्तावही राज्य सरकारकडे विचाराधिन आहे. त्याबरोबरच पनवेल सीएसएमटी एलिवेटेड मार्गही राज्य सरकारनं पुढाकार घेतल्यास मार्गी लागेल, असं अग्रवाल यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram