MSEB : महावितरणच्या कामगार संघटनांचं नितीन राऊतां पत्र, खासगीकरणाबाबत खुलासा करण्याचं आव्हान
राज्यातील 16 शहरांचा वीज वितरण परवाना खासगी कंपन्यांकडे देण्याबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. आता याच मुद्यावरुन महावितरणच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. महावितरणच्या 26 संघटनांनी या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहिलंय. खासगीकरणाच्या बातम्या खऱ्या की खोट्या याबाबत खुलासा करण्याचं आव्हान या पत्रातून देण्यात आलंय. हे वृत्त खरं असेल तर विरोध करण्याचा इशारा संघटनांनी दिलाय. या संदर्भात कर्मचारी, अधिकारी, अभियंते रस्त्यावर येऊन विरोध करतील असा इशारा कृती समितीने पत्राद्वारे दिलाय. 16 शहरांचा वीज वितरण परवाना मिळवण्यासाठी तीन खासगी कंपन्यांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळतेय. या 16 शहरांमध्ये नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण, भांडुप, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अकोल्याचा समावेश असल्याचं समजतंय.