Thane Vaccination : ...लस घेतली नाही तर पगार सुध्दा नाही, ठाणे महानगरपालिकेची अनोखी शक्कल

Continues below advertisement

लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं आता नवी शक्कल लढवलीय. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलं नसेल तर त्यांचा पगार थांबवला जाणार आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिलीय. ठाण्यात आजपासून घरोघरी जाऊन लसीकरण केलं जाणार आहे. दुकानांमधील कर्मचाऱ्यांनी डोस घेतला नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. 100 टक्के लसीकरणासाठी ठाणे महापालिकेचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मोहीम 30 नोव्हेंबरपर्यंत राबवली जाणार आहे. ठाण्यात 11 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर सहा लाख ठाणेकरांचे दोन्ही डोस झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram