Thane Building Collapse : राबोडी येथे इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू ABP Majha
राबोडी येथील खत्री इमारतीचे तीन स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलाची प्रकृती चिंता जनक आहे. आज सकाळी राबोडी येथील खत्री अपार्टमेंट नावाची इमारतीच्या सी विंगचे तीन स्लॅब कोसळून खाली पडले, त्यामध्ये तीन लोक जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले असता दोन मयत झाले असून एकावर उपचार चालू आहेत, सध्या बिल्डिंग मधील ७५ कुटुंब बाहेर काढली आहेत, या ठिकाणी महानगरपालिका अधिकारी तसेच अग्निशमन दल अधिकारी टी डी आर एफ ठाणे पथक उपस्थित असून, टी डी आर एफ पथकाने रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले आहे