लावणी सम्राज्ञी Surekha Punekar आता राजकीय फड गाजवणार; 16 सप्टेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील.