Thackeray Camp Protest : म्हाडा पुनर्विकास धोरणाबाबत ठाकरे गटाचं आंदोलन, शिंदे सरकारवर टीकास्त्र

मुंबईतील लालबाग परिसरात ठाकरे गटाने आक्रोश आंदोलन केलं. म्हाडा पुनर्विकास धोरणाबाबत हे आंदोलन पुकारण्यात आलं. शिंदे-फडणवीस सरकारने शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडवल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.. मुंबईतील म्हाडाच्या तसेच जुन्या आणि उपकरप्राप्त शेकडो इमारती कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचा जीव धोक्यात असतानाही शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी यांनी केलाय.. या इमारतींसंदर्भात धोरण राज्य सरकाने काल धोरण जाहीर केलं.. मात्र  ठाकरे गटाच्या आंदोलनाला घाबरुन श्रेय घेण्यासाठी हे धोरण जाहीर करण्यात आल्याचा आरोप अजय चौधरी यांनी केलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola