Karnataka : कर्नाटकातील हिजाब वादाचं बोट पकडत दहशतवादी संघटना अल कायदानं भारताबाबत गरळ ओकलंय

Continues below advertisement

कर्नाटकातील हिजाब वादाचं बोट पकडत दहशतवादी संघटना अल कायदानं भारताबाबत गरळ ओकलेय. हिजाबवर बंदी घालणे ही दडपशाही असून भारतीयांनी त्याविरोधात आवाज उठवावा, असं वक्तव्य मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अयमन अल जवाहिरीनं केलं आहे. तसेच त्याने कर्नाटकातील हिजाब गर्ल मुस्कानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अल कायदाच्या अधिकृत शबाब मीडियाद्वारे हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला असून SITE या गुप्तचर यंत्रनेनं हा व्हिडिओ खरा असल्याचा दुजोरा दिला आहे. हा नऊ मिनिटांच्या या व्हिडिओत जवाहिरीनं 'नोबल वुमन' म्हणत मुस्कानचं कवितेतून कौतुक केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram