Teacher's Pension Scheme : जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी आंदोलन, पोलीस-आंदोलकांमध्ये बाचाबाची
Continues below advertisement
राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंश: अनुदानित संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. ह्या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ पूर्वी झाली आहे. त्यामुळे आम्हालाही जुनी पेन्शन योजना लागू करा अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. मागील ५-६ दिवसांपासून हे सर्व कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र, विधान भवनात एकाही आमदाराने दखल न घेतल्याने आज सर्व आंदोलक कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी विधान भवनाकडे कूच करत होते. यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट बघायला मिळाली. यावेळी पोलिसांनी ३४ आंदोलक नेतेमंडळींना ताब्यात घेतलंय. दरम्यान, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा इशारा ह्या आंदोलकांनी दिला आहे. यासंदर्भात आंदोलकांशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी…
Continues below advertisement