CNG महागल्याने टॅक्सीचालक आक्रमक, मुंबईत टॅक्सीचालकांचा संपाचा इशारा

Continues below advertisement

मुंबईत टॅक्सीचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. सीएनजीच्या किमतीत गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड टॅक्सीचालकांना पडतोय. ही वाढ चालकांनाही परवडणारी नसल्याने टॅक्सीच्या प्रवासी भाडेदरात किमान पाच रुपये वाढ करावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केलीय. ही वाढ न केल्यास संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिलाय. मुंबईत साधारण ३५ हजार काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी या सीएनजीवरच धावतात. सध्या टॅक्सींचं किमान भाडे २५ रुपये इतके आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram