Sweepers Protest | मुंबईत सफाई कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, ना अपेक्षित पगार, ना मूलभूत सुविधा
महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरू आहे आणि मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. मात्र या मुंबईला स्वच्छ ठेवतायत ते कर्मचारी आज रस्त्यावर उतरले आहेत. लॉकडाऊन असला किंवा कुठलंही संकट असो हे कर्मचारी आपल्या सेवेत तत्पर असतात मात्र त्यांच्यासोबतच पालिकेकडून चुकीचा व्यवहार झाल्याची टीका त्यांनी केली आहे, योग्य पगार नाही, मूलभूत सुविधा न दिल्याचं त्यांनी म्हटलंय.