Sushma Andhare Dasara Melava Speech : देवेंद्रजींचे कान उपटा.. अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
Sushma Andhare : शिंदे साहेब तुम्ही महापुरुषांचं राजकारण केलं तुम्हाला एकही आंदोलन हाताळता आलं नाही, असे म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. शिंदे साहेब तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या. धार्मिक दंगली घडवायला शांतिगिरी महाराजाच्या पाठीशी उभे राहिलात असेही अंधारे म्हणाल्या.
10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये देवेंद्र फणवीसांनी आणि नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलची कुदळ मारली होती. मात्र, गेल्या 10 वर्षात बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक वीट देखील रचली नाही असे अंधारे म्हणाल्या. याच्या उलट दीक्षाभूमीचं खोदकाम केलं. यांची अघोरी भूक संपत नाही. अरबी समुद्रातील स्मारक उभं केलं नाही असेही अंधारे म्हणाल्या. शिंदे साहेब तुम्ही छत्रपती शिवराय यांच्या पायाशी जाऊन शपथ घेतली असेही अंधारे म्हणाल्या.
विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे तुम्हाला धूळ चारतील
लोकसभेच्या निवडणुकीला यांना रामाने चितपट केलं. विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे तुम्हाला धूळ चारतील असे म्हणत सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणतात की, फेक नरेटिव्ह तयार केलं जात आहे. कसलं फेक नरेटिव्ह. फडणवीसंनी अंतकरणावर मनावर हात ठेवावा आणि सांगावं फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र तुम्ही स्वत: आहात असे अंधारे म्हणाल्या.