Suraj Chavan ED Enquiry : सूरज चव्हाणांच्या भावाच्या 3 कंपन्यांची कोविड काळातील व्यवहारांची चौकशी
Continues below advertisement
कथित कोविड सेंटर घोटाळ्यासंबंधी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची सोमवारी साडे आठ तास चौकशी झाली. मात्र ही चौकशी आता चव्हाण यांच्या कुटुंबीयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. कारण सूरज चव्हाण यांच्यानंतर आता ईडीने त्यांच्या भावाच्या खासगी कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चव्हाण यांच्या भावाच्या नावावर तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. कोविड काळात या कंपन्यांशी बीएमसीचा कुठलाही व्यवहार झाला होता का, कुठलं टेंडर या कंपनीला मिळालं होतं का, याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत.
Continues below advertisement