Sudhir Mungantiwar : या सरकारला Night Life प्रिय, जसा राजा तशी प्रजा, डान्स बार प्रकरणावरून टोला
Continues below advertisement
नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाण्यातून डान्सबारचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं. प्रशासनानं कारवाई केली. अजूनही ते सगळे डान्सबार बंद आहेत. पण, ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावरच नवी मुंबईमध्ये डान्सबारचं नवं पेव फुटलंय. फक्त डान्स बार नाही, तर त्याच्या आड वेश्याव्यवसायही सुरु आहे. एक, दोन नाही...तर तब्बल सहा ठिकाणी एबीपी माझाचा कॅमेरा पोहोचला. आणि तिथला काळेधंदे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Continues below advertisement