ST Workers Strike : सरकारचं तेरावं घालणार, सदाभाऊ खोत आक्रमक ABP Majha
Continues below advertisement
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. कारण एसटीच्या शासकीय विलीनीकरणाच्या मागणीवर परिवहनमंत्री बोलत नसल्याचा आरोप आमदार सदाभाऊ खोतांनी केलाय. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या मान्य केल्यात, शासकीय विलीनीकरणाचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर घेऊ, असं परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. त्यात परवाची परिवहनमंत्री आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळाची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आंदोलकांनी परबांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचं ठरवलं. पण पोलीस बंदोबस्त वाढवल्यानं आणि वेळीच रोखल्यानं आंदोलकांना परबांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करता आलेलं नाही. त्यात आता एसटी संपावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांसह विरोधकांनी शिवसेनेवर संप दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलाय.
Continues below advertisement