ST Workers Strike : सरकारला काळीजचं नाही, लवकरचं आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार : Gopichand Padalkar

एसटी संपाला दोन आठवडे झाले तरी तोडगा निघण्याची कोणतीच चिन्हं दिसत नाहीत. दिवाळीपासून राज्याची जीवनवाहिनी ठप्प आहे. तर दुसरीकडे एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण मांडलंय. सरकारनं संप मागे घेण्याचं आवाहन केलं असलं तरी कामगारांनी ते धुडकावलं आहे. त्यातच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात हजर व्हावं असं आवाहन आंदोलक नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केलंय. अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचं काम सुरू असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सांगितलं. पण दोन्ही बाजूंकडून चर्चेत तोडग्याची कोणतीही चिन्हं दिसत नसल्यानं संपाचा तिढा कायम आहे.

एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यातली बोलणी पुढे सरकतच नाहीत. त्यामुळे आंदोलक आता काय करणार याकडे सर्वांचंं लक्ष लागलंय. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील प्रमुख नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी....

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola