ST Worker Strike : ST चं शिष्टमंडळ Devendra Fadnavis यांच्या भेटीला, अनिल परब-फडणवीस यांची भेट
गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यापार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे एसटी कर्मचार्यांच्या पाठिशी आहे असं आश्वासन या एसटी कर्मचाऱ्यांना दिलंय. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्यांतही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली.