ST Bus : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी-गणपतीला कोकणात जाण्यासाठी एसटीचं आरक्षण सुरु

 गणेशोत्सव महिन्याभरावर आल्यानं मुंबईत नोकरी-धंद्यानिमित्त राहणाऱ्या कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. यंदाच्या गौरी-गणपती उत्सवासाठी मुंबईकरांनी एसटीचं आरक्षण करण्यास सुरुवात केलेय.  आजवर ६१ बसगाड्यांची समूह नोंदणी झाली आहे. मुंबई, ठाणे व पालघर या तीनही विभागांतून कोकणासाठी जादा वाहतूक केली जाणार आहे. यात एकूण १,०४३ बसगाड्या सोडल्या जातील. आत्तापर्यंत १६७ बसगाड्यांचे पूर्ण आरक्षण झाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola