Jalna : जावईबापू, हे वागणं बरं नव्हं! दारुच्या नशेत जावयाचं सासुरवाडीत शोले आंदोलन
Continues below advertisement
जालनाच्या जाफराबाद तालुक्यातल्या सोनखेडा गावात मंगेश शेळके हा जावई सासुरवाडीच्या लोकांशी वाद घालत महावितरणच्या टॉवरवर चढला. पत्नीशी वाद झाल्यानं रागाच्या भरात तो २२० केव्ही क्षमतेच्या टॉवरवर चढला आणि त्याची समजूत काढताना व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ आले. जावई गावकऱ्यांना जुमानायला तयार नव्हता, तेव्हा पोलिसांना पाचारण करावं लागलं. गावकरी आणि पोलिसांनी चार तास समजूत घातल्यानंतर तो खाली उतरला. दारुच्या नशेत त्यानं हे शोले आंदोलन केलं, असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं.
Continues below advertisement