Special Report | मुंबईत सायकल खरेदीसाठी चक्क वेटिंग लिस्ट; सायकल विक्रित 5महिन्यात दप्पट वाढ
जर तुम्ही सध्या एक उत्तम सायकल घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या टू व्हिलर किंवा फोर व्हिलरप्रमाणे योग्य असं प्लानिंग करावं लागेल. कारण मुंबईत सध्या सायकलसाठी वेटिंग लिस्ट सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या चार महिन्यांत जगभरात सायकलची रेकॉर्डब्रेक विक्री झाल्यानं मुंबईसह जगभरातील सर्व महानगरांमध्ये सध्या हीच अवस्था आहे.