Special Report | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात वृक्षतोड
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात झाडांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जाहिरात होर्डिंग मालकाच्या आर्थिक फायद्यासाठी ही झाडं तोडली जातायत. इतकंच नाही तर त्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारलं जातंय असा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. यासंदर्भात मनसेकडून मुंबई महापालिका आयुक्त आणि उद्यान अधीक्षकांना तक्रारीचं पत्र देण्यात आलंय. पाहूयात आमची प्रतिनिधी मनश्री पाठकचा रिपोर्ट.