Mumbai Taxi | मुंबईतील टॅक्सींवर प्रवाशांच्या सोयीकरता तीन रंगाचे दिवे | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत प्रवास करताना टॅक्सी महत्त्वाची भूमिका निभावते. प्रवाशांना टॅक्सीला हात करुन टॅक्सी थांबवावी लागते. अनेकदा टॅक्सी रिकामी नसेल तरी लोक हात दाखवत टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर कधी टॅक्सी रिकामी असेल तरी टॅक्सी चालक आपल्याला घेऊन जाण्यास तयार होत नाही तर कधी रिकामी टॅक्सी न थांबता सुसाट निघून जाते. त्यामुळे प्रवाशांचे टॅक्सी चालकांशी नेहमीच वाद होतात. मात्र आता मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सींवर तीन रंगाचे दिवे लागणार आहेत. त्यामुळे टॅक्सी आपल्यासाठी उपलब्ध आहे की नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement