Ganesh Utsav 2020 | एक प्रभाग-एक गणपती संकल्पनेसाठी मुंबई महापालिका प्रशासनाचं आवाहन |स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
मुंबईत एक प्रभाग एक गणपती राबवण्याचे मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे. अंधेरी पश्चिम इथं पालिकेच्या के पश्चिम विभागाच्या वतीने हे आवाहन करण्यात आलं आहे. के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी हे आवाहन केलं आहे. मात्र, या आवाहनाला मुंबईतील सार्वनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं विरोध केलाय.
के पश्चिम या विभागात 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असली तरी 13 प्रभागात 13 सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोविड संकटात गर्दी होवू नये, यासाठी पालिकेने हे आवाहन गणेश मंडळांना केलं आहे. "एका प्रभागात एकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून इतर ठिकाणी कोविडचे स्क्रिनिंग कॅम्प, रक्तदान शिबिर घेण्यात यावे" असं आवाहन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी केलंय.
Continues below advertisement
Tags :
Ganpati Aagman Ganpati 2020 Ganesha Idol Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Cm Thackeray Bmc Uddhav Thackeray