व्हॉल्व असलेला एन-95 मास्क वापरणे सुरक्षित नाही? व्हॉल्व्ह असणारा मास्क धोकादायक, तज्ज्ञांचं मत

Continues below advertisement
पुणे : कोरोना व्हायरस हा हवेतूनही पसरु शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर वॉल्व्ह असलेले मास्क वापरण्याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातील पल्मोकेअर रिसर्च आणि एज्यूकेशन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी यांच्या सांगण्यानुसार एन-95 मास्क हे प्रदूषणापासून सुरक्षित राहता यावं, यासाठी बनवण्यात आले आहेत. त्यामुळे व्हॉल्व असलेला मास्क हा एन-95 मास्क जरी असेल, तरीही त्या व्यक्तीला श्वास घेताना फिल्टर हवा मिळते. पण श्वास सोडताना मात्र त्या व्हॉल्वमधून फिल्टर न झालेलीच हवा बाहेर पडते. प्रदूषित भागात काम करताना याची काही अडचण नाही. पण आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून एन-95 मास्कचा वापर हा व्हायरसपासून स्वत:चा बचाव होण्यासाठी आणि आपल्यापासून दुसऱ्या कोणाला संसर्ग होणार नाही यासाठी वापरला जातो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram