Dombavali Pollution | डोंबिवली प्रदूषणाच्या विळख्यात | ABP Majha
डोंबिवली पूर्व, पश्चिम आणि ठाकुर्ली परिसरात काल मध्यरात्रीपासून उग्र दर्प पसरला होता. यामुळे नागरिकांना श्वास घेणंही मुष्कील झालं होतं. हा दर्प डोंबिवलीच्याच खंबाळपाडा एमआयडीसी भागातून गॅस उत्सर्जन करण्यात आल्यामुळे झाल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, डोंबिवलीत आणि विशेषतः खंबाळपाडा परिसरात यापूर्वीही केमिकलचं सांडपाणी नाल्यात सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण झालं होतं. त्यानंतरही सातत्यानं असे प्रकार सुरूच असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी सपशेल डोळेझाक करतायत. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर मनसेनं याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.