Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट

Continues below advertisement

Special Report Mumbai Local :  मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट कॅलेंडरच्या आकड्यांना आणि घड्याळाच्या काट्यांना टांगलेलं आयुष्य घेऊन, तुम्ही आम्ही मुंबईकर जगत असतो. पायाला भिंगरी लावून पळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आधार असतो तो लोकल ट्रेनचा. बॅगा सांभाळत मुंबईकर रेल्वे स्थानकावर येतात. श्वास कोंडणाऱ्या गर्दीतून वाट काढत लोकलमध्ये चढतात. तिथंही चौथी सीट सोडा, नीट उभं राहायला मिळालं तरी बास, अशी मुंबईकरांची भावना असते. त्यात आता मुंबईची ही जीवनवाहिनी अनेकांच्या आयुष्याची दोरी कापण्यालाही कारणीभूत ठरू लागलीय. हे आम्ही म्हणत नाहीय, तर तशी धक्कादायक आकडेवारी हाती आलीय. आणि त्यावरूनच आता मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाचे कान पकडलेत. पाहूयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट.

मुंबईची लोकल हीच मुंबईची दहशतवादी आहे, असे आम्ही का म्हणतोय तर याचे कारण हाय कोर्टाच्या सुनावणीत समोर आले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघरस्थित यतीन जाधव यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर काल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू झाली. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर हा 38.08 टक्के असून हाच मृत्यूदर न्यूयॉर्कमध्ये 9.08 टक्के, फ्रान्समध्ये 1.45 टक्के आणि लंडनमध्ये 1.43 टक्के इतका असल्याचं या याचिकेत म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram