Mumbai : Bombay Gymkhana वर खास सोहळ्याचं आयोजन, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांची उपस्थिती
Continues below advertisement
१९३३ साली भारतीय भूमीवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्याला ८८ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मुंबईच्या ऐतिहासिक बॉम्बे जिमखान्यावर एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या याच बॉम्बे जिमखान्याच्या मैदानात १९३३ साली भारत आणि इंग्लंड संघांत पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्याच मैदानात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अभिनेता सुनील शेट्टी आणि आदिनाथ कोठारे हेही उपस्थित होते.
Continues below advertisement