Girls Marriage Age : मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव

Continues below advertisement

Raise Marriage Age of Women from 18 to 21 : मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होऊ शकतो. कारण मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सरकार दरबारी हालचाली सुरु झाल्या आहेत. या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram