Sonu Sood Income Tax Survey :सोनू सूदच्या घर आणि कार्यालयाची आयकर विभागाकडून दुसऱ्या दिवशीही सर्व्हे
Sonu Sood Income Tax Survey : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयाची जवळपास 20 तास आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली. बुधवारी पहाटे सहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या 12 जणांचं पथक अभिनेता सोनू सूदच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर सोनू सूद आणि कुटुंबियांचे फोन आयकर विभागाकडून बंद करण्यात आले होते. दरम्यान, घर आणि कार्यालयासह एकूण 6 जागी आयकर विभागानं पाहणी केली.
दरम्यान आयकर विभागाकडून दुसऱ्या दिवशीही पाहणी करण्यात येत आहे.