Sion Hospital | सायन रुग्णालयातील 'त्या' व्हिडीओची मुंबई महानगरपालिकेकडून दखल, चौकशीचे आदेश
सायन रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये मृतदेहांशेजारीच रूग्णांवर उपचार केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बेडवर काळ्या प्लास्टिकमध्ये बांधलेल्या अवस्थेत दिसत आहेत. तर शेजारच्या बेडवर कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं दिसतं आहे.